जेफ बेझोस च्या ऑनलाईन साम्राज्याची वेधक कहानी.....!
जेफ बेझोसच्या ऑनलाईन साम्राज्याची वेधक कहानी.....!
आफाट यश माणूस नशिबाने कधीच मिळवू शकत नाही. त्यासाठी अंगी क्षमता आणि गुणवैशिष्ट्येही असावे लागतात. मी जेफ बेझोस "ॲमेझॉन" विषयी बोलत आहे. अवघ्या तीस-पस्तीस वर्षात अफाट यश मिळवणारा हा माणूस जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे.
जसे त्याचे चाहते व प्रशंसक आहेत तसेच त्याच्याबद्दल विलक्षण कडवट उद्गार काढणारे देखील आहेत. जेफ बेझोस हा "प्रिडेटर" आहे अशा शेलक्या शब्दात त्याची संभावना करणारेही अनेक जण आहेत. उद्योजकाच्या मनात एकाच वेळी अनेक गोष्टींचा कल्लोळ चालू असतो. तो बाजूला सारत आपल्या विचारात आणि कार्यात सुस्पष्टता आणणे गरजेचे आहे. असे म्हणणाऱ्या जेफ बेझोस यांनी 1994 मध्ये "ॲमेझॉन" कंपनीची सुरुवात केली आणि, "ॲमेझॉन" ने 1995 मध्ये पुस्तक विक्रीची सुरुवात केली. ग्राहकांसाठी तीन गोष्टी या सर्वाधिक महत्त्वाच्या असतात उत्पादनाची निवड वापरातील सुकरता आणि किंमत या त्रिसूत्रीचा उपयोग करत सर्वप्रथम पुस्तक विक्री हा व्यवसाय चालू करण्यात आला. जेफ चे म्हणणे आहे ग्राहकांच्या प्रश्नावर उत्तर शोधणे हे ग्राहकाचे काम नाही ते तुमचे काम आहे. त्यासाठी तुमची शक्ती बुद्धी सर्जनशीलता वापरली पाहिजे. आपली कंपनी ही केवळ नफा मिळवणारी कंपनी असायला हवी का ? निश्चितच.....! नफा मिळवल्याशिवाय कुठल्याही कंपनीला पुढील वाटचाल करता येत नाही. दीर्घ काळ खंडात तुम्हाला एक टिकाऊ आणि बळकट व्यवसाय उभा करायचा असेल तर तुम्हाला ते करावंच लागेल पण त्यासाठी आज कंपनीचे व्यवस्थापन आपत्कालीन नफ्याचं उद्दिष्ट बाळगत असेल तर तो दूरदृष्टी पूर्ण निर्णय म्हणता येणार नाही. असं ठाम मत असणाऱ्या जेफ यांनी 1996 मध्ये थर्ड पार्टी विक्रेत्यांना "ॲमेझॉन" वर त्यांची उत्पादने विकण्यास परवानगी दिली.
Superb
ReplyDelete