जेफ बेझोस च्या ऑनलाईन साम्राज्याची वेधक कहानी.....!






          जेफ बेझोसच्या ऑनलाईन साम्राज्याची वेधक कहानी.....! 

आफाट यश माणूस नशिबाने कधीच मिळवू शकत नाही. त्यासाठी अंगी क्षमता आणि गुणवैशिष्ट्येही असावे लागतात. मी जेफ बेझोस "ॲमेझॉन" विषयी बोलत आहे. अवघ्या तीस-पस्तीस वर्षात अफाट यश मिळवणारा हा माणूस जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. 

जसे त्याचे चाहते व प्रशंसक आहेत तसेच त्याच्याबद्दल विलक्षण कडवट उद्गार काढणारे देखील आहेत. जेफ बेझोस हा "प्रिडेटर" आहे अशा शेलक्या शब्दात त्याची संभावना करणारेही अनेक जण आहेत. उद्योजकाच्या मनात एकाच वेळी अनेक गोष्टींचा कल्लोळ चालू असतो. तो बाजूला सारत आपल्या विचारात आणि कार्यात सुस्पष्टता आणणे गरजेचे आहे. असे म्हणणाऱ्या जेफ बेझोस यांनी 1994 मध्ये "ॲमेझॉन" कंपनीची सुरुवात केली आणि, "ॲमेझॉन" ने 1995 मध्ये पुस्तक विक्रीची सुरुवात केली. ग्राहकांसाठी तीन गोष्टी या सर्वाधिक महत्त्वाच्या असतात उत्पादनाची निवड वापरातील सुकरता आणि किंमत या त्रिसूत्रीचा उपयोग करत सर्वप्रथम पुस्तक विक्री हा व्यवसाय चालू करण्यात आला.  जेफ चे म्हणणे आहे ग्राहकांच्या प्रश्नावर उत्तर शोधणे हे ग्राहकाचे काम नाही ते तुमचे काम आहे. त्यासाठी तुमची शक्ती बुद्धी सर्जनशीलता वापरली पाहिजे. आपली कंपनी ही केवळ नफा मिळवणारी कंपनी असायला हवी का ?  निश्चितच.....! नफा मिळवल्याशिवाय कुठल्याही कंपनीला पुढील वाटचाल करता येत नाही. दीर्घ काळ खंडात तुम्हाला एक टिकाऊ आणि बळकट व्यवसाय उभा करायचा असेल तर तुम्हाला ते करावंच लागेल पण त्यासाठी आज कंपनीचे व्यवस्थापन आपत्कालीन नफ्याचं उद्दिष्ट बाळगत असेल तर तो दूरदृष्टी पूर्ण निर्णय म्हणता येणार नाही. असं ठाम मत असणाऱ्या जेफ यांनी 1996 मध्ये थर्ड पार्टी विक्रेत्यांना "ॲमेझॉन" वर त्यांची उत्पादने विकण्यास परवानगी दिली.






                           1997 मध्ये कंपनीचे सार्वजनिकीकरण करण्यात आले. 1998 मध्ये जर्मनी इंग्लंड या देशातून "ॲमेझॉनच्या" सेवेला सुरुवात करण्यात आली त्यासोबतच, 1999 साली खेळणी गेम्स इलेक्ट्रॉनिक्स विक्रीची सुरुवात "ॲमेझॉन" वर  करण्यात आली याच साली 'टाईम' या मासिकातर्फे जेफची "पर्सन पर्सन ऑफ द इयर" म्हणून निवड करण्यात आली. 2000 साली "ॲमेझॉन" कंपनीचे बोधचिन्ह सादर करण्यात आले तर,2002 साली कॅनडामध्ये "ॲमेझॉन" कंपनीची सुरुवात करण्यात आली. यावेळी फ्री शिपिंगची सुविधा पुरवण्यासाठी "फ्री सुपर सेवर शिपिंग योजनेची" सुरुवात ही करण्यात आली. 2007 साली "ॲमेझॉन" ने "अमेझॉन किंडल "हे ई बुक रीडर उपकरण बाजारात आणले.या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा उहापोह सुधीर सेवेकर यांनी लिहिलेल्या "ॲमेझॉन" या पुस्तकात करण्यात आला आहे. नवीन उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी व एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी आदर्श असे हे पुस्तक आहे. हे सर्वांनी वाचलेच पाहिजे स्मार्टफोनवर केलेल्या एका क्लिकसरशी घरबसल्या हवी ती वस्तू खरेदी करता येऊ शकेल याचा आपण स्वप्नात तरी कधी विचार केला होता का ? अर्थातच नाही......... पण जेफने हेच स्वप्न उराशी बाळगून ई-कॉमर्स व्यवस्थापनात पदार्पण केले.या पुस्तकाचे लेखक सुधीर सेवेकर यांनी याआधी "रतन टाटा", "बिल गेट्स", "सुभाषचंद्र गोयल", यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत.तर या वाचूया एक उत्कंठावर्धक आणि प्रेरणादायी जेफ बेझोसच्या ऑनलाईन साम्राज्याची वेधक कहानी.......!"ॲमेझॉन"......!


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

असामान्य व्यक्तींच्या यशाची गुपिते.....!

चिकन सूप फॉर द सोल........!

सर्वात कठीण काम सर्वात आधी करा......!