चिकन सूप फॉर द सोल........!



 "तुमचे विचार बदला आणि मग तुमचे जग बदलेल." जेव्हा खूप कठीण काळ येतो, निराशा जनक गोष्टी घडून आपल्याला वैफल्य येतं आणि आपली ध्येय आपण साध्य करू शकत नाही,तेव्हा मनात हे शब्द आठवावेत.

अलीकडच्या काही शास्त्रीय अभ्यासामधून असे सिद्ध झाले आहे की,सकारात्मक वृत्तीचे अगदी प्रत्यक्ष मोजता येईल इतके फायदे आहेत. कृतज्ञ आणि सकारात्मक वृत्ती असणारी माणसं असं सांगतात की, त्यांच आयुष्य अधिक चांगलं असतं व त्यांच्या आठवणीही खूप सकारात्मक असतात. जे लोक अनुकूल किंवा विधायक प्रसंग आठवू शकतात, ते अत्यंत अवघड किंवा कठीण अशा परिस्थितीत सुद्धा मनाची लवचिकता आणि आनंदी वृत्ती टिकवून ठेवू शकतात, जे लोक आयुष्यात घडलेल्या फक्त चांगल्या गोष्टींचा मागवा घेत राहतात, त्यांच आयुष्य अधिक सशक्त, अधिक कार्यक्षम आणि अधिक परिपक्व असतं.

मी "चिकन सूप फॉर द सोल" या पुस्तकाबद्दल बोलत आहे. "चिकन सूप फॉर द सोल"या पुस्तक मालिकेतल्या सगळ्या गोष्टी म्हणजे, सकारात्मक विचार कसा करावा याची उत्तम उदाहरण आहेत. सकारात्मक विचारांचा अवलंब करून आपलं आयुष्य कसं सुधाराव आणि आव्हानावर मात कशी करावी, हे अनेकांनी आपल्या वागण्यावरून प्रत्यक्ष दाखवून दिलआहे.



अशापैकीच काही जिगरबाज माणसांनी त्यांच्या स्वतःच्याच शब्दात लिहिलेले हे त्यांचे अनुभव वाचणाऱ्यालाही अचंबित करणारे आहेत; शिवाय आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे आहेत. सकारात्मक विचार तुमच आयुष्य कसं बदलू शकतात, सुसह्य करू शकतात,हे दाखवून देणाऱ्या या खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत. अचानक समोर उभा ठाकलेल्या आणि आयुष्यच उध्वस्त करायला आलेल्या वेगवेगळ्या प्रसंगावर, संकटावर सकारात्मक विचारांच्या मदतीने कशी मात करता येते, याचीही चालती बोलती उदाहरणं आहेत. निश्चयान सकारात्मक मनोवृत्तीकडे, विचारांकडे वळण्याचा आणि त्यायोगे आपल आयुष्य आनंदमय, शांततामय करण्याचा सतत प्रयत्न करायला हवा, असा मौल्यवान विचार हे पुस्तक आपल्याला नक्कीच देत, यात शंका नाही.

आयुष्य म्हणजे एक कसोटी आहे,माणसाने भूतकाळात जगण्यापेक्षा वर्तमान काळ आपलासा करून घ्यायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीतील जडलेला अनुभव उपभोगा,कारण एक दिवस तुम्ही जेव्हा मागे वळून पहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की, त्या गोष्टी खरंतर मोठ्याच आहेत. आपली प्रवृत्ती ही एक अशी छोटीशी गोष्ट आहे की,जी खूप मोठा बदल घडवू शकते. आयुष्यातील एकमेव अपंगत्व म्हणजे वाईट प्रवृत्ती शब्दांमध्ये विनाश करण्याची, आणि तो भरून काढण्याची अशी दोन्ही ताकद असते. जेव्हा शब्द सच्चेही असतात आणि प्रेमळ ही तेव्हा ते आपले जगच बदलून टाकू शकतात, असं बुद्धांनी म्हटलेलं आहे.



या पुस्तकातील व्यक्तिरेखा, सगळ्या व्यक्ती भलेही वेगवेगळ्या देशात राहत असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतील, तरी त्या सर्व एकच विचारधारा पाळतात. इतरांच्या आयुष्याला स्पर्श करणं, इतरांना सामावून घेताना आपल्या जाणवेच वर्तुळ विस्तारन, सच्चेपणा दाखवणं, देण्याबरोबरच घेण्यासाठी सुद्धा स्वतःला मोकळं ठेवणं, ही कुठलीही परिकथा नव्हे, " चिकन सूप फॉर द सोल" या पुस्तकाच्या लेखकाला भेटलेल्या सर्वच विस्मयकारक लोकांचं चपखल वर्णन आहे.

सर्वसाधारण मनुष्य व योद्धा या दोघातला मूलभूत फरक म्हणजे,योद्धा प्रत्येक गोष्ट एक आव्हान मानतो व सर्वसाधारण मनुष्य प्रत्येक गोष्ट एक दैवी देणगी तरी मानतो किंवा शाप तरी मानतो. वाईट अनुभवातून गेल्यावर त्यातच गुंतून राहण्यापेक्षा त्यातून बाहेर येऊन तुम्ही पुढच आयुष्य कसं जगता हे फक्त तुमच्या हातात असतं. शेवटी विद्वत्ता म्हणजे काय, शिक्षण म्हणजे काय, तुम्हाला आधीच ज्ञात असलेल्या गोष्टींचा शोध घेणे, म्हणजे तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी प्रदर्शित करणे. शिकवणे म्हणजे तुमच्या इतकेच दुसऱ्यांनाही तेवढे ज्ञान आहे याची त्यांना जाणीव करून देणे. म्हणजेच थोडक्यात काय तर तुम्ही सगळे विद्यार्थी, कार्य करणारे व शिक्षक या तिन्हीचा सुरेख संगम आहात. 

शेवटी काय पैसा आणि प्रसिद्धी यांनी माणसे आपोआप सुखी होत नाहीत,तर, सुख आतून यावे लागते. "चिकन सूप फॉर द सोल" तुम्हाला यासाठी उल्हासित करेल. जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे चिकन सूप मालिकेचे संस्थापक व निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत. या दोघांनी लेखन व संकलन केलेल्या चिकन सूप या मालिकेची सध्या 200 शीर्षक आहेत. आणि जगभरातील 40 भाषांमधील वाचकांपर्यंत ती पोहोचली आहेत तर चला वाचूया "चिकन सूप फॉर द सोल" हे विस्मयकारी पुस्तक.




Comments

Popular posts from this blog

असामान्य व्यक्तींच्या यशाची गुपिते.....!

सर्वात कठीण काम सर्वात आधी करा......!