असामान्य व्यक्तींच्या यशाची गुपिते.....!
अत्यंत यशस्वी लोकांबद्दल साधारणतः नेहमीच एक कथा सांगितली जाते. त्यात त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि महत्त्वकांक्षा बद्दल बोलले जाते परंतु यशाची खरी कहाणी यापेक्षा फार वेगळी असते.
याबद्दल बोलण्यासाठीच माल्कम ग्लॅडवेल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. आपल्याला समजून घ्यायचे आहे की काही असामान्य व्यक्ती यशाच्या उत्तुंग शिखरावर का पोहोचल्या, तर केवळ त्यांची बुद्धी ,महत्त्वकांक्षा यावर लक्ष केंद्रित न करता त्यांच्या अवतीभवती नजर टाकावयास हवी; त्यांचे कुटुंब, त्यांचे जन्मस्थळ किंवा अगदी त्यांची जन्मतारीख या गोष्टींचा देखील विचार करावयास हवा.
जगातील सर्वोत्कृष्ट दहा स्टार्टअप पैकी सात स्टार्टअप हे अमेरिकेतील असतात. एलोन मस्क इतका सफल माणूस केवळ अमेरिकेतच जन्म घेऊ शकतो ,भारतातील ओडीसाच्या दुर्गम भागात नाही. एलोन मस्क भारतातील उडीसाच्या दुर्गम भागात जन्म घेऊन इतका सफल होऊ शकेल ? आपलं व्यक्तिमत्त्व इतकंच जर महान आहे, तर बनवून दाखवावं उडीसाच्या दुर्गम भागात..! एलोन मस्क सगळीकडे जन्म घेतात, पण बनतात अमेरिकेत कारण तिथली इकॉनोमी ऑप्शन्स देते .तिथे नॉलेज इकॉनोमी आहे. तेथे प्रत्येक गोष्ट मिळते .स्टार्टअप करण्यासाठी पैसा आरामात मिळतो. सरकारकडून दबाव नसतो.तेथील उदारमतवाद सपोर्ट करतो ,ही विचारधारा दुनियेत इतरत्र कोठे आढळत नाही. सांगायचा उद्देश असा की तेथील एन्व्हायरमेंट वेगळे आहे .परिस्थिती वेगळी आहे .भारतात हुशार व्यक्तींची कमी आहे का? निश्चित नाही, पण त्या प्रकारचा सेटअप परिस्थिती सपोर्ट मिळणे ही गरजेचे आहे.
या सर्व गोष्टीची व्याख्या करावयास गेलो, तर लक्षात येते की यशाची कहाणी वेगळी आहे. माल्कम ग्लॅडवेल यांनी यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे. असामान्य कर्तुत्व असलेली काही महान व्यक्तिमत्व अशी आहेत, जी आजही आपणास सर्व परिचित नाहीत. ती व्यक्तिमत्वे यशाचे अदृश्य वाटेकरी ठरतात. अशा व्यक्तींच्या यशस्वी ते मागे कोणकोणत्या पूरक गोष्टीचा वरदहस्त होता, या विषयाचे तर्कनिष्ठ विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीतूनही अशी व्यक्तिमत्व यशस्वी कशी होतात, याचे गमक ग्लॅडवेल यांनी स्पष्ट केले आहे. ग्लॅडवेल हे आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रीचा उच्चांक मोडणाऱ्या "मोठ्या परिणामांच्या छोट्या गोष्टी" आणि "ब्लिंक" या पुस्तकाचे लेखक आहेत. शेवटी प्रतिकूल परिस्थितीत सानुकूल प्रतिभाव कसा ठेवला जाऊ शकतो, याचे उदाहरण देतो... थॉमस अल्वा एडिसन ज्या लाईटवर संशोधन करत होते ती त्यांची कंपनी एक दिवस पूर्ण जळाली अशा अवस्थेत त्यांनी आपल्या सहकाऱ्याला सांगून आपल्या पत्नीला बोलावले. तिने आयुष्यात एवढी राख कधीच पाहिली नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. प्राप्त परिस्थितीतील ही शांतता त्यांचे व्यक्तिमत्त्वच अधोरेखित करते. ज्यावेळी त्यांच्या पत्नीने ती राख पाहिली त्यावेळी त्या तीव्रतेने खाली कोसळल्या. त्यावेळी त्यांना उठवत एडिसन म्हणाले जे कामाचं नव्हतं ते जळालं....! ज्यावेळी,तो त्यांनी त्या वेळेपर्यंत केलेल्या संशोधनाचा संपूर्ण डाटा होता. तो संपूर्ण डाटा त्यावेळी संपुष्टात आला होता. आता नव्याने जे कामाचं आहे ते करू ....!असे म्हणून कामाला लागलेल्या एडिसन यांनी केलेलं काम म्हणजे आपण आज पाहतो ती लाईट ....! एडिसन यांना मिळालेले हे यश चमत्काराने नव्हे कामातील सातत्यामुळे मिळाले हे महत्वाचे .आयुष्यात जरूर वाचावं असं पुस्तक "असामान्य व्यक्तींच्या यशाची गुपिते" अनुवाद प्राध्यापक पुष्पा ठक्कर आणि स्मिता अवलगावकर जरूर संग्रहित ठेवावं असं पुस्तक. वाचक प्रेमींसाठी पुस्तकांची लिंक वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment