अर्थाच्या शोधात........!

 

                                                    "अर्थाच्या शोधात"

 दररोज जर तासाला दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते स्वतःच्या जीवनातील उद्दिष्ट शोधणे ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात प्रबळ प्राथमिक जीवन यज्ञासाठी ठिणगी पुरवणारी प्रेरक शक्ती आहे.

 आज पर्यंत असे पाहण्यात आले आहे की आयुष्याला आकार देणारा कुठलाही मोठा निर्णय घेण्यासाठी आपल्या सोबत किंवा आपल्यासमोर घडणारी एखादी घटनाच कारणीभूत ठरते. मी डॉक्टर व्हिक्टर फ्रॅन्कल यांनी लिहिलेल्या "मॅन्स सर्च फोर मिनिंग" म्हणजेच "अर्थाच्या शोधात.....!" या पुस्तकाबद्दल बोलतोय ज्याचा,मराठी अनुवाद डॉक्टर विजया बापट यांनी केला आहे .डॉक्टर व्हिक्टर फ्रॅन्कल  हे ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट व सायकॉलॉजिस्ट होते. परंतु डॉक्टर फ्रॅन्कल यांचे मनोवैज्ञानिक  म्हणून नाही तर एक सामान्य कैदी म्हणून आलेले अनुभव तसेच ,प्रत्येकाच्या जीवनात आलेल्या बिजरूप शक्तीचे बल जगाला दाखवण्यासाठी डॉक्टर फ्रॅन्कल  यांनी हे पुस्तक लिहायचे ठरवले असे ते सांगतात. पुस्तकाच्या उत्तरार्धात लोगोथेरपी या उपचार पद्धतीचं वर्णन केलं आहे. लोगोथेरपी ही उपचार पद्धती लेखकाला नाझींच्या यातना शिबिरातून छळछावण्यातून अनुभवास आली. आयुष्यातील प्रत्येक अवस्थेला तोंड कसे द्यायचं हे ठरवायचं आपलं स्वातंत्र्य अभाधित असतं हे लोगो थोरपीचं एक प्रमुख तत्त्व आहे....!



 या शिबिरातून बाहेर पडल्यावर लेखकाने झपाटल्यासारखे नऊ दिवसात हे पुस्तक लिहून पूर्ण केले .त्यांचे हे झपाटले पण पुस्तकात प्रत्येक ठिकाणी अधोरेखित होते .नाझींच्या छळ छावण्यांचा अनुभव घेतलेले डॉक्टर फ्रॅन्कल म्हणतात तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणी बनता की नाही हे तुमच्या निर्णयावर अवलंबून असते त्याच वेळी आपले मानसिक स्वातंत्र्य घालून आत्मसन्मान गमावून मेंढरासारखे मनानेही कैदी होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अभाधित असते.




 आयुष्यात उद्भवलेल्या कठीण तिल कठीण परिस्थितीतही म्हणजेच अगदी प्रतिकूल परिस्थितीतही जगण्यास सामर्थ देणारे मनोबल कसे मिळवले पाहिजे याचे, विवेचन करणारे लेखन सोप्या सुटसुटीत निवेदन शैलीतील तत्त्वज्ञानाचा विचार म्हणजे "अर्थाचा शोधात" हे पुस्तक तर चला निघूया एका सुंदर अनुभवाच्या शोधातआणि, वाचूया "अर्थाच्या शोधात.....!" ब्लॉगच्या वरील बाजूस तीन लाईन्स दिसतात तेथे पुस्तकाची लिंक दिलेली आहे तर, या घेऊया हे पुस्तक आणि सुंदर विचार......! डॉक्टर "व्हिक्टर फ्रॅन्कल" यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर विजया बापट यांनी मराठीत अनुवाद केलेलं "अर्थाच्या शोधात" हे पुस्तक......!

                                                       


Comments

Popular posts from this blog

असामान्य व्यक्तींच्या यशाची गुपिते.....!

चिकन सूप फॉर द सोल........!

सर्वात कठीण काम सर्वात आधी करा......!