Posts

Showing posts from July, 2023

सर्वात कठीण काम सर्वात आधी करा......!

Image
  अतिशय महत्त्वाची आणि अवघड काम हाता वेगळी करा..... आज, आत्ता, ताबडतोब....! यासाठी गरज आहे नियोजनाची. नियोजन म्हणजे भविष्याला वर्तमानात आणणे जेणेकरून तुम्ही आजच त्याबद्दल काहीतरी ठोस कृती करू शकाल.हे मी "ब्रायन ट्रेसी" यांनी लिहिलेल्या "सर्वात कठीण काम सर्वात आधी करा" या पुस्तकाबद्दल बोलतोय.....! आपल्याकडे कामांची लांबलचक यादी नेहमीच तयार असते आणि त्यातील सगळ्याच गोष्टी पार पाडण्यासाठी आवश्यक तो वेळ आपल्यापाशी कधीच उपलब्ध नसतो. अर्थातच पुढेही तो कधीच नसेल. यासाठी यशस्वी लोक अत्यंत महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करतात व ती तत्परतेने पूर्ण करतात. सध्याचा काळ हा सर्वोत्तम आहे.आपली ध्येय साध्य करण्यासाठी जेवढ्या संधी आणि शक्यता आज उपलब्ध आहेत, तेवढ्या याआधी कधीच नव्हत्या. मानवी इतिहासात बहुदा पहिल्यांदाच आपण पर्यायांच्या महासागरात डुंबच आहोत. किंबहुना एवढ्या चांगल्या गोष्टी आजूबाजूला आहेत की, जीवनात आपण नक्की काय आणि किती साध्य करणार हे सर्वस्वी आपल्या निवड क्षमतेवर अवलंबून आहे. असं असूनही तुम्ही आताच्या सर्वसाधारण लोकांसारखेच असाल, "तर रात्र थोडी सोंग फार" ...

असामान्य व्यक्तींच्या यशाची गुपिते.....!

Image
अत्यंत यशस्वी लोकांबद्दल साधारणतः नेहमीच एक कथा सांगितली जाते. त्यात त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि महत्त्वकांक्षा बद्दल बोलले जाते परंतु यशाची खरी कहाणी यापेक्षा फार वेगळी असते.  याबद्दल बोलण्यासाठीच  माल्कम ग्लॅडवेल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. आपल्याला समजून घ्यायचे आहे की काही असामान्य व्यक्ती यशाच्या उत्तुंग शिखरावर का पोहोचल्या, तर केवळ त्यांची बुद्धी ,महत्त्वकांक्षा यावर लक्ष केंद्रित न करता त्यांच्या अवतीभवती नजर टाकावयास हवी; त्यांचे कुटुंब, त्यांचे जन्मस्थळ किंवा अगदी त्यांची जन्मतारीख या गोष्टींचा देखील विचार करावयास हवा.  जगातील सर्वोत्कृष्ट दहा स्टार्टअप पैकी सात स्टार्टअप हे अमेरिकेतील असतात. एलोन मस्क इतका सफल माणूस केवळ अमेरिकेतच जन्म घेऊ शकतो ,भारतातील ओडीसाच्या दुर्गम भागात नाही. एलोन मस्क भारतातील उडीसाच्या दुर्गम भागात जन्म घेऊन इतका सफल होऊ शकेल ? आपलं व्यक्तिमत्त्व इतकंच जर महान आहे, तर बनवून दाखवावं उडीसाच्या दुर्गम भागात..!  एलोन मस्क सगळीकडे जन्म घेतात, पण बनतात अमेरिकेत कारण तिथली इकॉनोमी ऑप्शन्स देते .तिथे नॉलेज इकॉनोमी आहे. ...