Posts

Showing posts from June, 2023

अर्थाच्या शोधात........!

Image
                                                       "अर्थाच्या शोधात"  दररोज जर तासाला दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते स्वतःच्या जीवनातील उद्दिष्ट शोधणे ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात प्रबळ प्राथमिक जीवन यज्ञासाठी ठिणगी पुरवणारी प्रेरक शक्ती आहे.  आज पर्यंत असे पाहण्यात आले आहे की आयुष्याला आकार देणारा कुठलाही मोठा निर्णय घेण्यासाठी आपल्या सोबत किंवा आपल्यासमोर घडणारी एखादी घटनाच कारणीभूत ठरते. मी डॉक्टर  व्हिक्टर फ्रॅन्कल यांनी लिहिलेल्या "मॅन्स सर्च फोर मिनिंग" म्हणजेच "अर्थाच्या शोधात.....!" या पुस्तकाबद्दल बोलतोय ज्याचा,मराठी अनुवाद डॉक्टर विजया बापट यांनी केला आहे .डॉक्टर व्हिक्टर फ्रॅन्कल  हे ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट व सायकॉलॉजिस्ट होते. परंतु डॉक्टर फ्...

जेफ बेझोस च्या ऑनलाईन साम्राज्याची वेधक कहानी.....!

Image
            जेफ  बेझोस च्या ऑनलाईन साम्राज्याची वेधक कहानी.....!   आफाट यश माणूस नशिबाने कधीच मिळवू शकत नाही. त्यासाठी अंगी क्षमता आणि गुणवैशिष्ट्येही असावे लागतात. मी जेफ बेझोस "ॲमेझॉन" विषयी बोलत आहे. अवघ्या तीस-पस्तीस वर्षात अफाट यश मिळवणारा हा माणूस जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे.  जसे त्याचे चाहते व प्रशंसक आहेत तसेच त्याच्याबद्दल विलक्षण कडवट उद्गार काढणारे देखील आहेत. जेफ  बेझोस  हा "प्रिडेटर" आहे अशा शेलक्या शब्दात त्याची संभावना करणारेही अनेक जण आहेत. उद्योजकाच्या मनात एकाच वेळी अनेक गोष्टींचा कल्लोळ चालू असतो. तो बाजूला सारत आपल्या विचारात आणि कार्यात सुस्पष्टता आणणे गरजेचे आहे. असे म्हणणाऱ्या जेफ बेझोस यांनी 1994 मध्ये "ॲमेझॉन" कंपनीची सुरुवात केली आणि, "ॲमेझॉन" ने 1995 मध्ये पुस्तक विक्रीची सुरुवात केली. ग्राहकांसाठी तीन गोष्टी या सर्वाधिक महत्त्वाच्या असतात उत्पादनाची निवड वापरातील सुकरता आणि किंमत या त्रिसूत्रीचा उपयोग करत सर्वप्रथम पुस्तक विक्री हा व्यवसाय चालू करण्यात आला.  जेफ चे म्हणणे आहे ग्राहकांच्या प्र...