चिकन सूप फॉर द सोल........!

"तुमचे विचार बदला आणि मग तुमचे जग बदलेल." जेव्हा खूप कठीण काळ येतो, निराशा जनक गोष्टी घडून आपल्याला वैफल्य येतं आणि आपली ध्येय आपण साध्य करू शकत नाही,तेव्हा मनात हे शब्द आठवावेत. अलीकडच्या काही शास्त्रीय अभ्यासामधून असे सिद्ध झाले आहे की,सकारात्मक वृत्तीचे अगदी प्रत्यक्ष मोजता येईल इतके फायदे आहेत. कृतज्ञ आणि सकारात्मक वृत्ती असणारी माणसं असं सांगतात की, त्यांच आयुष्य अधिक चांगलं असतं व त्यांच्या आठवणीही खूप सकारात्मक असतात. जे लोक अनुकूल किंवा विधायक प्रसंग आठवू शकतात, ते अत्यंत अवघड किंवा कठीण अशा परिस्थितीत सुद्धा मनाची लवचिकता आणि आनंदी वृत्ती टिकवून ठेवू शकतात, जे लोक आयुष्यात घडलेल्या फक्त चांगल्या गोष्टींचा मागवा घेत राहतात, त्यांच आयुष्य अधिक सशक्त, अधिक कार्यक्षम आणि अधिक परिपक्व असतं. मी " चिकन सूप फॉर द सोल" या पुस्तकाबद्दल बोलत आहे. " चिकन सूप फॉर द सोल" या पुस्तक मालिकेतल्या सगळ्या गोष्टी म्हणजे, सकारात्मक विचार कसा करावा याची उत्तम उदाहरण आहेत. सकारात्मक विचारांचा अवलंब करून आपलं आयुष्य कसं सुधाराव आणि आव्हानावर मात कशी करावी, हे अनेकांनी आ...